एमएड 86% उपस्थिती, एचएमसीटी कमी!-86% Attendance in M.Ed Exam

86% Attendance in M.Ed Exam!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी घेतलेल्या एमएड (Master of Education) प्रवेश परीक्षेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल ८६.६० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ही परीक्षा ४६ केंद्रांवर घेण्यात आली.

86% Attendance in M.Ed Exam!एकूण ३,९८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३,४५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ५३४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. नाशिक जिल्ह्यातही २४० पैकी २११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

दुसरीकडे, एमएचएमसीटी (Hotel Management) अभ्यासक्रमासाठी मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी दिसून आला. ५५ नोंदणींपैकी केवळ २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, म्हणजेच सुमारे ५२.७३ टक्के उपस्थिती नोंदवली गेली.

दरम्यान, बीएड प्रवेश परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून १.१० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पारलिंगी, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व परीक्षा संगणकाधारित पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर पार पडणार आहेत.

Comments are closed.