राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे ही बाब गंभीर ठरली आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे सुचविली होती.
आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८० टक्के रिक्त पदे त्वरित भरली जातील. उर्वरित २० टक्के पदांसाठी लवकरच मान्यता दिली जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, भरती प्रक्रिया लवकरच निश्चित केली जाईल. तसेच, एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठांचे गुण कमी झाल्यामुळे रँकिंग खाली आले आहे; विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणांमुळे हा फरक निर्माण झाला आहे, अशी माहिती त्यांनी कुलगुरूंकडून घेतली आहे.
फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, योजना, ४२ वसतिगृह आणि पूर्ण २७% आरक्षण लागू केले जात आहेत. कुणबी नोंदी असलेल्या उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये.

Comments are closed.