Amravati जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस भरती प्रक्रियेच्या आठव्या दिवशी शुक्रवारी शारीरिक चाचणीसाठी एकूण २००० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी १३६४ उमेदवार मैदानावर उपस्थित राहिले, तर ६३६ उमेदवार गैरहजर राहिले. उपस्थित उमेदवारांपैकी १२७७ जणांनी प्रत्यक्ष शारीरिक चाचणीत सहभाग घेतला.

यामध्ये ७८४ उमेदवार उत्तीर्ण झाले, तर ४९२ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले. तसेच ८४ उमेदवार शारीरिक मापदंडात अपात्र आढळले, तर ३ उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरले. एका उमेदवाराचा निकाल वैद्यकीय कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान युवकांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. जिल्हा पोलिस अधीक्षक Vishal Anand यांनी सांगितले की, ही भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि काटेकोर नियोजनासह राबविण्यात येत आहे.
उन्हाचा वाढता तीव्रतेचा विचार करून मैदानी चाचणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता उमेदवारांना सकाळी ५.३० ऐवजी पहाटे ४ वाजताच मैदानावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, परीक्षा दीड तास आधी सुरू केली जात आहे.

Comments are closed.