शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवरील विविध अभ्यासक्रमांत दुसऱ्या फेरीअखेर सुमारे ७५ टक्के जागा भरल्या आहेत. एकूण १५१० जागांपैकी ११०४ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, ४०६ जागा अजूनही रिकाम्या आहेत.
पहिल्या फेरीत ८३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीमुळे थोडा संथ प्रतिसाद मिळाला, पण ऑफलाईन पर्याय दिल्यावर गती वाढली. दुसऱ्या फेरीतही भरपूर प्रवेश झाले, पण अजूनही १८ अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची गरज आहे.
पुर्ण क्षमतेने भरलेले कोर्सेस:
एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स
फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी
एमए योगशास्त्र
बी.लिब.
अजूनही रिक्त जागा असलेले कोर्सेस:
पदार्थविज्ञान, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, नॅनोसायन्स, बीजे, मास कम्युनिकेशन, एमएसडब्ल्यू, एमबीए (ग्रामीण विकास), इत्यादी.
प्रवेशासाठी मुदत वाढवली – ३१ जुलैपर्यंत:
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी सांगितलं की, अजूनही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही. म्हणून प्रवेशाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. गरज भासल्यास तिसरी फेरीही घेतली जाणार आहे.
