दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (DDA) मध्ये काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी गोड बातमी आली आहे. डीडीएकडून ग्रुप A, B आणि C मधील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
किती जागा व अर्जाची तारीख?
ही भरती एकूण 1732 पदांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया 6 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन, शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2025 अशी आहे. उमेदवार फक्त dda.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतील.
कोणती पदं उपलब्ध?
या भरतीत अधिकारी ते सहाय्यक स्तरावरील विविध पदांचा समावेश आहे –
डिप्टी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, लीगल असिस्टंट, प्लॅनिंग असिस्टंट, आर्किटेक्चरल असिस्टंट, प्रोग्रामर, जूनियर इंजिनिअर, सेक्शनल ऑफिसर, नायब तहसीलदार, जूनियर ट्रान्सलेटर, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सर्वेयर, स्टेनोग्राफर, पटवारी, जूनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, माळी व मल्टी टास्किंग स्टाफ (MTS).
यामध्ये MTS (745 जागा) सर्वाधिक असून, त्यानंतर माळी (282 जागा) व जूनियर सेक्रेटेरियट असिस्टंट (199 जागा) या पदांचा समावेश आहे.
पात्रता व इतर माहिती
आतापर्यंत केवळ शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं असून, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगारमान आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात येईल. तांत्रिक, प्रशासकीय व सहाय्यक स्तरावर सर्व उमेदवारांना संधी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
भरतीची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षेचं प्रवेशपत्र काही दिवस आधीच संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
का करावी ही नोकरी?
डीडीएमध्ये नोकरी मिळाल्यास फक्त पगारच नव्हे तर सुविधा, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता देखील मिळेल. राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी स्थिर भवितव्याची हमी मिळवण्यासाठी ही संधी सोडू नका.

किती जागा व अर्जाची तारीख?
Comments are closed.