सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी GAIL (India) Limited ने एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही निवड प्रक्रिया GATE-2026 च्या गुणांच्या आधारे राबवली जाणार असून पात्र उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या भरतीअंतर्गत एकूण ७० पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (केमिकल) – १७, इन्स्ट्रुमेंटेशन – २१, इलेक्ट्रिकल – १६ आणि मेकॅनिकल – १६ जागांचा समावेश आहे. सर्व पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी शाखेत किमान ६५ टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच GATE-2026 मधील संबंधित विषयाचा पेपर देणे अनिवार्य आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना ₹६०,००० ते ₹१,८०,००० या आकर्षक वेतनश्रेणीत पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील ‘Recruitment’ विभागात जाऊन GATE-2026 Executive Recruitment पर्याय निवडावा, नोंदणी करून आवश्यक शैक्षणिक तपशील व GATE क्रमांक भरून अर्ज सादर करावा.
उत्कृष्ट करिअर आणि भरघोस वेतनाची संधी साधण्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.