७० आयटीआयत सौर-ईव्ही अभ्यासक्रम!-70 ITIs: Solar & EV Courses!

70 ITIs: Solar & EV Courses

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालकांनी महाराष्ट्रातील ७० शासकीय आयटीआय संस्थांमध्ये ‘सोलर टेक्निशियन’ व ‘ईव्ही मेकॅनिक’ (इलेक्ट्रिक व्हेईकल) अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

70 ITIs: Solar & EV Coursesही प्रशिक्षण योजना हरित तंत्रज्ञान, नवऊर्जा व शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानली जात आहे. या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना सौर पॅनेल इन्स्टॉलेशन, वायरिंग, ईव्ही रिपेअरिंग व चार्जिंग स्टेशन उभारणीचे थेट प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

चेंबूरमध्ये उच्चस्तरीय शासकीय आयटीआयची स्थापना करण्यालाही केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून, इथेही अनेक आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

उद्योग क्षेत्रात मागणी वाढलीच!
भारतासह मिडल ईस्ट, युरोप आणि आफ्रिकामध्येही सौर व ईव्ही तंत्रज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी खुल्या होणार आहेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार:
“राज्यातील आयटीआय दर्जावाढीसाठी व अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करण्यासाठी हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत,” असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.

Comments are closed.