केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये निवड झालेल्या ६१ हजार तरुण-तरुणींना आज नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. या निमित्ताने देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून, देशातील ४५ ठिकाणी एकाच वेळी १८वा रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. या उपक्रमातून तरुणांना थेट सरकारी सेवेत सामील होण्याची संधी मिळत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देत सरकार दरवर्षी अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करत आहे. यंदाच्या मेळाव्यात विविध विभागांतील निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून ११ लाखांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, तसेच उच्च शिक्षण मंत्रालयासह अनेक मंत्रालयांतील उमेदवारांचा यात समावेश आहे.

Comments are closed.