५,१४९ सरकारी शाळा विद्यार्थीविना!-5,149 Govt Schools Without Students!

5,149 Govt Schools Without Students!

देशातील शिक्षणव्यवस्थेची गंभीर स्थिती उघड करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात देशभरातील तब्बल ५,१४९ सरकारी शाळांमध्ये एकही विद्यार्थी नोंदलेला नव्हता.

5,149 Govt Schools Without Students!ही माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली असून, पश्चिम बंगाल आणि तेलंगण या राज्यांत अशा शाळांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासोबतच दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्याही गेल्या दोन वर्षांत २४ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प किंवा शून्य असतानाही या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘युडायस’ (Unified District Information System) च्या आकडेवारीनुसार ही स्थिती समोर आली असून, शिक्षण नियोजन आणि संसाधनांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शिक्षणावर मोठा खर्च होत असतानाही शाळा विद्यार्थीविना असणे ही बाब चिंताजनक आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.