सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकदम चांगली बातमी समोर आलीये. महाराष्ट्र बँकेत जनरलिस्ट ऑफिसर पदांसाठी तब्बल ५०० जागा रिकाम्या असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑनलाइनच करायचा आहे आणि शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे.
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी (किंवा एकात्मिक दुहेरी पदवी) असावी, आणि किमान ६०% गुण असणं गरजेचं आहे. आरक्षित वर्गांसाठी ही अट ५५% गुणांवर आहे. सीए पास झालेल्यांनाही अर्ज करता येईल. किमान ३ वर्षांचा अनुभव असावा – विशेषतः बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातला.
वयोमर्यादा: ३१ जुलै २०२५ रोजी उमेदवाराचं वय २२ ते ३५ वर्षं असावं.
एससी/एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षांची, ओबीसीसाठी ३ वर्षांची सूट आहे. इतर आरक्षित वर्गांसाठीही नियमानुसार सूट दिली जाईल.
फी:
सर्वसामान्य वर्गासाठी – ₹११८०/-
राखीव वर्गासाठी – ₹११८/-
ऑनलाइन अर्ज १३ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेत.
लवकर अर्ज करा आणि संधीचा फायदा घ्या!

Comments are closed.