डिसेंबरमध्ये 4 दिवस शाळा बंद! – 4-Day School Holiday!

4-Day School Holiday!

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध कारणांमुळे शाळांना सलग चार दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यासंदर्भात अधिकृत आदेशही जारी करण्यात आले आहेत. अभ्यासाच्या दडपणातून थोडी विश्रांती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

4-Day School Holiday!या सुट्ट्यांमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शिक्षक संघटनांचा राज्यव्यापी संप आणि ६ डिसेंबर रोजीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ही प्रमुख कारणे आहेत. अनेक ठिकाणी शाळांच्या इमारती मतदान केंद्र म्हणून वापरल्या जात असल्याने २ डिसेंबर रोजी शाळा बंद राहणार आहेत.

तसेच ५ डिसेंबर रोजी टीईटी संदर्भातील निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे शाळांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. ६ डिसेंबर रोजी मुंबई व परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर ७ डिसेंबरला रविवार असल्याने विद्यार्थ्यांना आपोआप साप्ताहिक सुट्टीचा लाभ मिळणार आहे.

या चार दिवसांच्या ‘लाँग विकेंड’मुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही सहल, प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, ही सुट्टी संपूर्ण राज्यासाठी एकसारखी नसून जिल्हानिहाय वेगळी असू शकते. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या जिल्हा प्रशासन किंवा शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही सुट्टी विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजनाचीच नव्हे, तर वाचन, छंद आणि मानसिक विश्रांतीसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

Comments are closed.