पुणे व नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अनियमित प्रवेशाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने ताबडतोब कारवाई सुरू केली आहे. यामध्ये डी.वाय. पाटील, एमआयटी, सिंहगडसह ३९ महाविद्यालयांवर निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
निरीक्षक महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, याची पूर्ण तपासणी करतील. प्रवेश माहिती पुस्तिकेतील नियम क्र. १३ नुसार सर्व कागदपत्रे, निकष आणि प्रक्रिया योग्यरित्या पार पडत आहेत का याची पडताळणी केली जाईल. काही त्रुटी आढळल्यास सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाला दिल्या जातील.
पुण्यातील गेनबा मोझे कॉलेज, एमआयटी आळंदी, भारती विद्यापीठ, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, सिंहगड आणि डी.वाय. पाटीलसह अन्य ३२ महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपूर विभागात जी. एच. रायसोनी, कमिन्स, सूर्योदया, बजाज महाविद्यालयांसह ७ महाविद्यालयांचा समावेश आहे.
युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यावर कॉलेजवर ऑब्झर्व्हर नेमले गेले आहेत, आणि १६ सप्टेंबरपर्यंत तपासणी अहवाल सादर करणे अनिवार्य आहे.

Comments are closed.