नाशिक महापालिका भरती प्रश्नावलीवर ३५७ आक्षेप; उत्तरतालिकेत बदलाची प्रक्रिया सुरू! | 357 Objections in Nashik Municipal Exam!

357 Objections in Nashik Municipal Exam!

नाशिक महापालिकेतील अभियंता व अग्निशमन संवर्गातील ३०० हून अधिक पदांच्या नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ मार्फत घेतलेल्या लेखी परीक्षेतील प्रश्नावलीवर तब्बल ३५७ आक्षेप नोंदवले गेले आहेत. या भरतीसाठी एकूण १९,४९८ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी १५,५८२ उमेदवारांनी परीक्षेत सहभाग नोंदवला.

357 Objections in Nashik Municipal Exam!

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रत्येक आक्षेपाची पडताळणी पुराव्यांच्या आधारे केली जाईल आणि आवश्यकतेनुसार उत्तरतालिकेत बदल केले जातील. अभियंता संवर्गातील ११४ पदे आणि अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांसाठी १८६ पदांवर या परीक्षेचा परिणाम पंधरा हजारांहून अधिक उमेदवारांवर अवलंबून आहे.

‘टीसीएस’ मार्फत चालवण्यात आलेली ही भरती प्रक्रिया महापालिकेत तब्बल २४ वर्षांनंतर होत असल्याने संपूर्ण राज्याचा लक्ष या भरतीकडे लागले आहे. आक्षेप पडताळणी पूर्ण झाल्यानंतर निकालाची गुणवत्तायादी (Merit List) जाहीर केली जाईल, असे लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (प्रशासन), महापालिकेने सांगितले.

Comments are closed.