राज्यातील शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र मिळाले नसल्याने, अनेक शिक्षकांना वेतनश्रेणी बदलासाठी प्रस्ताव पाठवता येत नव्हता. त्यामुळे शिक्षकांचा मार्ग अडचणीत होता. आता एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देणार असल्याने मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी शिक्षकांना १२ वर्ष पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी, आणि २४ वर्षांनंतर निवडश्रेणी लागू होते. यासाठी प्रशिक्षण व चाचण्या होतात, त्यानंतरच प्रमाणपत्र व वेतनश्रेणी बदल होते.
यंदा राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील ४०,०८१ शिक्षकांनी नोंदणी केली, त्यापैकी ३९,८४१ पात्र ठरले. प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये पार पडले. ५,५२७ शिक्षक अनुत्तीर्ण झाले, ३४,३१४ प्रशिक्षण पूर्ण केले आणि ३३,५७२ शिक्षक चाचणीत उत्तीर्ण झाले. अद्याप ५६३ शिक्षकांची प्रक्रिया बाकी आहे.
दहावी-बारावीची परीक्षा चालू असतानाच हजारो शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले तरी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे नाराज शिक्षकांना आता पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे दिली जातील.