राज्यात आज उद्योग गुंतवणुकीचे तब्बल १७ करार झालेत. यामुळं जवळपास ३४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय, आणि यातून ३३ हजार लोकांना कामं मिळणार – असं सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी.
या करारांमधलं:
५ करार उत्तर महाराष्ट्रासाठी – नाशिक, नंदुरबारला फायदा
५ करार पुणे विभागासाठी – ११,९६६ कोटींची गुंतवणूक
६ करार विदर्भात – नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत गुंतवणूक
रायगडमध्ये ३ हजार कोटींचा प्रोजेक्ट – मोठ्या प्रमाणावर रोजगार
फडणवीस म्हणाले, “बाहेरच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रावर उद्योजकांचा जास्त विश्वास आहे. इलेक्ट्रिक बस, ट्रक, स्टील, सोलर – सगळ्या क्षेत्रात कामं येणार आहेत.”
नांदेड पूरस्थितीवर फडणवीसांचं वक्तव्य:
“नांदेडला भारी पाऊस झालाय. वरच्या भागातल्या धरणांतून पाणी सोडलं गेलंय. ५०० लोक अडकले आहेत. प्रशासनानं लष्कराला बोलावलंय. लोकांना सुरक्षित बाहेर काढलं जातंय. जिवीतहानी होऊ नये म्हणून सगळं शक्य ते केलं जातंय” – असंही त्यांनी सांगितलं.

Comments are closed.