MPSC 2025 भरती सुरु 320 पदांसाठी अर्ज करा, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया तपासा!
320 Vacancies in MPSC 2025.
मित्रांनो महाराष्ट्रत सरकारी नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आत्ताच एमपीएससीने 320 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, ज्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ च्या पदांचा समावेश आहे. या रिक्त पदांमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, तसेच विविध विषयातील तज्ज्ञांसाठी 95 पदे असतील. हि पदभरती म्हणजे पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधीच आहे.
पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल सांगायचं तर, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी आणि संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 38 वर्षे आहे, आणि राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल. या भरतीमध्ये महिलांसाठी, खेळाडूंसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज करतांना आपल्या पात्रतेच्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी https://mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण अर्ज भरावा. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹719 आणि मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी ₹449 आहे. शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाइन भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ती तारखेनंतर अर्ज न करता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी या भरतीत मोठ्या संधी आहेत. सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्य करण्याची ही सुवर्णसंधी आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज नक्की करावा.