अहो, रेल्वेमध्ये तब्बल ३० हजारांवर पदं भरतीसाठी जाहीर झालीत. दहावी, बारावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी ही भारीच सुवर्णसंधी आहे. इतक्या वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर रेल्वेची “जम्बो भरती” सुरू झालीये.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत एनटीपीसी भरती २०२५ अंतर्गत ही पदं निघाली असून क्लर्क, स्टेशन मास्टर, गार्ड, टायपिस्ट, कमर्शियल अप्रेंटिस, ट्रॅफिक अप्रेंटिस आदी महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे.
👉 अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे.
👉 सर्व राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात.
👉 अनुसूचित जाती-जमाती व महिला उमेदवारांना शुल्कात सवलत आहे.
👉 परीक्षा वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल.
भारतीय रेल्वेमध्ये सेवा द्यायची इच्छा असणाऱ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये. त्वरित कागदपत्रं तयार करून अर्ज करायला सुरुवात करा!

Comments are closed.