South Central Railway मध्ये २८०१ अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार असून ११ एप्रिल २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
या भरतीअंतर्गत इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मशीनिस्ट, पेंटर, COPA, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटार मेकॅनिक अशा विविध ट्रेडमध्ये पदे भरली जाणार आहेत. एकूण २८०१ जागांवर उमेदवारांची निवड केली जाईल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. उमेदवारांचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
अर्ज प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. तर सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा.

Comments are closed.