महिलांसाठी २७ नवी कॉलेजेस!-27 New Women’s Colleges Approved!

27 New Women’s Colleges Approved!

राज्यात महिलांच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात एकूण ३८ नवीन पदवी महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २७ महाविद्यालये केवळ महिलांसाठी असणार आहेत.

27 New Women’s Colleges Approved!ही महिला महाविद्यालये प्रामुख्याने ग्रामीण व अर्धनगरी भागात सुरू होणार असल्याने त्या भागातील मुलींना स्थानिक पातळीवरच उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

मंजूर महाविद्यालयांपैकी बहुतेक महाविद्यालये विनाअनुदानित स्वरूपात सुरू होणार असून, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या महाविद्यालयांचा समावेश प्रामुख्याने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होणार असून, इतर काही महाविद्यालये राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न असतील.

Comments are closed.