राज्यातील माता आणि शिशू मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभाग आता खऱ्या अर्थाने पुढे सरसावला आहे.तालुका रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध राहावेत, यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूदरात तब्बल २४ टक्क्यांनी घट झाली असून, आता आणखी सुधारणा करण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर तज्ञ डॉक्टरांची नेमणूक होणार आहे.
शेजारील राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात मातामृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने, गर्भवती महिलांची त्वरित तपासणी व आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यावर भर दिला जातोय.
यासाठी प्रत्येक तालुका हॉस्पिटलमध्ये दोन स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि बालरोगतज्ञांची नेमणूक केली जाणार आहे.
त्याचबरोबर, दर महिन्याला ३० किंवा त्याहून अधिक प्रसूती होणाऱ्या ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तज्ञ डॉक्टर कार्यरत राहणार आहेत.
१५ जिल्हास्तरीय सरकारी रुग्णालयांमध्ये १२५ सुपर स्पेशालिस्ट पदे तयार करण्यात आली आहेत — ज्यात हृदयरोग, मज्जातंतू, मूत्रपिंड, कर्करोग, श्वसनविकार आणि पोटविकार तज्ञांचा समावेश आहे.
रुग्णालयांतील सेवा सुधारण्यासाठी मोबाईल-आधारित हजेरी प्रणाली सुरू करण्यात आली असून, ९५% डॉक्टर आणि कर्मचारी नोंदणी करून सक्रीय सहभाग घेत आहेत.

Comments are closed.