महापालिकेला अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात २४६ पदांच्या भरतीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेतील मनुष्यबळाचा तुटवडा लक्षात घेता, ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आली आहे.
महापालिकेला ही पदे भरण्यासाठी उत्पन्न वाढवण्याचे निर्देश मिळाले आहेत. शासनाने ठरवलेल्या अर्हता निकषांचे काटेकोर पालन करीत, आस्थापना खर्च मर्यादेत राहूनच ही भरती करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
अग्निशमन विभागातील भरतीमध्ये स्टेशन ऑफिसर-३, सब ऑफिसर-९, चालक/यंत्रचालक-३६, फायरमन-१९८ अशा २४६ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी करारही करण्यात आला, परंतु आधीच्या अटींमुळे ती होऊ शकली नाही.
आता शिथिल केलेल्या आस्थापना अटींमुळे सिंहस्थासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे आणि आपत्ती नियोजनावर होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण मिळणार आहे.

Comments are closed.