पुणे विद्यापीठात २२० करार प्राध्यापक निवड !-220 Contract Professors Hired!

220 Contract Professors Hired!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल २२० सहायक प्राध्यापकांची करार पद्धतीनं नेमणूक करण्यात आली आहे. इतिहास, भूगोल, कॉमर्स, हिंदी, रसायनशास्त्र, गणित, शिक्षण, पर्यावरण, दूरस्थ शिक्षण विभाग अशा विविध विषयांसाठी ही भरती झाली आहे.

220 Contract Professors Hired!विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितलं की, या सर्वांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नेमणूक प्रक्रिया कशी झाली?
१८ जून रोजी हे पद भरतीचं परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं. त्यानुसार, १७ ते २१ जुलैदरम्यान संबंधित विभागांत मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांच्या शिक्षणातील गुणवत्ता, संशोधन, अध्यापन कौशल्य यासाठी ८० टक्के वेटेज आणि मुलाखतीतील २० टक्के गुण धरून १०० पैकी अंतिम गुण ठरवून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली.

Comments are closed.