मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे २० लाख महिलांचे मासिक ₹१५०० अनुदान eKYC मधील त्रुटींमुळे बंद करण्यात आले आहे. अनेक महिलांनी eKYC करताना चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचा लाभ नोव्हेंबरपासून थांबलेला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिलांचा यामध्ये समावेश असून, जळगाव जिल्ह्यातील जवळपास १ लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना घराघरांत जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अतिरिक्त कामाचा भार आणि इतर अडचणींमुळे अनेक अंगणवाडी सेविकांनी ही पडताळणी करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पडताळणी प्रक्रिया सध्या संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी ती थांबल्याचीही माहिती मिळत आहे.
eKYC पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांना ₹१५०० अनुदान पुन्हा सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पडताळणीचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.