नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी! एसटी महामंडळाने तब्बल १७ हजार ४५० पदांची कंत्राटी भरती जाहीर केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली असून, ही घोषणा एसटीच्या ३०० व्या कंत्राटी बैठकीत करण्यात आली.
भरती झालेल्या तरुण-तरुणींना एसटीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिल्यानंतरच ते चालक व वाहक पदांवर रुजू होतील. या कंत्राटाचा कालावधी ३ वर्षांचा असेल.
भरतीसाठीची ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विभागनिहाय सहा प्रादेशिक स्तरावर ही प्रक्रिया पार पडेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा किमान ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे.
एसटीमध्ये दरवर्षी जवळपास १००० इलेक्ट्रिक बसेस दाखल होत असल्याने, सेवेसाठी आवश्यक असलेले चालक, वाहक आणि सहाय्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ही मोठी भरती होत आहे. यामुळे राज्यातील हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

Comments are closed.