राज्यात पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई पदासाठी तब्बल १५,६३१ जागा भरल्या जाणार आहेत. मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या भरती प्रक्रियेला मंजुरी मिळाली.
विशेष बाब म्हणजे, २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अर्ज करण्याची एकदाच संधी देण्यात आली आहे.
ही भरती २०२४-२५ या वर्षासाठी असून, रिक्त व होणाऱ्या जागांचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवर भरती होणार आहे. लेखी परीक्षा OMR पद्धतीने होणार असून, त्यासाठीची सगळी तयारी आता सुरू होणार आहे.
पुण्यात नविन ५ पोलिस ठाणी उभारण्याचं जाहीर, आणि त्यासाठी लागणाऱ्या शिपायांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारनं वेळोवेळी पोलिस आणि कारागृहातील रिक्त पदं भरण्याचं काम हाती घेतलं असून, एक लाख लोकसंख्येमागे सध्या १७२ पोलिस आहेत.
गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ‘‘मागील काही वर्षात १७,००० व नंतर १८,००० पदांची भरती झाली होती. आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे, यामुळे पोलिस दल बळकट होईल.’’

Comments are closed.