अकरावीच्या प्रवेशात घडामोड!-11th Admission Update!
11th Admission Update!
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू असलेली ऑनलाइन प्रक्रिया सध्या तिसऱ्या फेरीत आहे. यामध्ये तब्बल ४.१० लाख विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेत आणि ८२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत अर्ज केलेत.
आता या सर्व विद्यार्थ्यांना २५ आणि २६ जुलै या दोनच दिवसांत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
मूळ वेळापत्रकानुसार २६ ते २८ जुलै पर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती, पण आता या वेळापत्रकात बदल करून ती मुदत २५ व २६ जुलैपर्यंतच करण्यात आली आहे.
या आधी दोन फेऱ्यांमध्ये ७.२० लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला, म्हणजे अजूनही निम्म्याहून अधिक विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. तिसऱ्या फेरीसाठी नव्याने १३,६२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.