राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सोमवारपासून, म्हणजेच २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून. https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ही प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच ‘प्रोसीड फॉर अॅडमिशन’ बटणावर क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
मुलांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये असलेली अस्वस्थता, ही तांत्रिक अडचणींमुळे वाढली होती. मात्र, डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी गुरुवारी स्पष्ट घोषणा करत ही प्रक्रिया नव्याने सुरू होत असल्याचे सांगितले.
अकरावी प्रवेशाचे महत्त्वाचे टप्पे :
२६ मे ते ३ जून : ऑनलाइन नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरणे (सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत)
५ जून : तात्पुरती गुणवत्ता यादी
६-७ जून : हरकती व सुधारणा
८ जून : अंतिम गुणवत्ता यादी निश्चित
९ जून : अल्पसंख्याक, इन-हाउस, व्यवस्थापन कोटा यादी
१० जून : पहिली प्रवेश यादी
११ ते १८ जून : महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश
महत्वाची सूचना:
जर विद्यार्थ्याने पहिल्या फेरीत प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात नाव आले असूनही प्रवेश घेतला नाही, तर तो चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एक क्लिकवर प्रवेश प्रक्रिया सुरू!
या संपूर्ण प्रक्रियेमुळे अकरावी प्रवेश अधिक पारदर्शक व सोपी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवून सर्व टप्पे काळजीपूर्वक पूर्ण करावेत.
चला तर मग, सज्ज व्हा आपल्या उज्वल भवितव्यासाठी – अकरावी प्रवेशाची पहिली पायरी आता तुमच्या हातात आहे!