राज्याच्या शिक्षण विभागानं २०२५-२६ सालच्या अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रिया सुरू केलीय. पहिल्या फेरीचं वेळापत्रक आणि विभागनिहाय जागांची माहिती जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना अर्ज भरायला सज्ज व्हावं लागणार आहे. शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय की, वेळेचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.
प्रवेश अर्जाची प्रक्रिया १९ मेपासून सुरू!
शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी अकरावी प्रवेशासाठी १९ मेपासून mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरणं सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी ‘न्यू रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन आयडी आणि डुप्लिकेशन नंबर मिळणार आहे, ज्याच्या साहाय्यानं पुढचे टप्पे पूर्ण करता येतील.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रं:
-
दहावीची गुणपत्रिका
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
रहिवासी पुरावा
-
फोटो
-
आधार कार्ड
ऑनलाइन फी भरणं अनिवार्य:
नोंदणीसाठी आवश्यक शुल्कही ऑनलाइन भरावं लागणार आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर ज्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, त्यांना प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितलंय.