रेल्वेत 11 हजार नोकऱ्यांची भरती!-11,000+ Railway Jobs Announced!

11,000+ Railway Jobs Announced!

रेल्वे विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ११,१२७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

11,000+ Railway Jobs Announced!या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होणार असून १४ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागेल.

या पदांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे ठेवण्यात आले आहे. उमेदवारांकडे दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया CBT परीक्षा, अॅप्टिट्यूड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट अशा टप्प्यांत होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी ₹19,900 पगारासह इतर सुविधा मिळणार आहेत.

Comments are closed.