1100 वैद्यकीय पदभरतीला मंजुरी!-1100 Medical Posts Cleared!

1100 Medical Posts Cleared!

राज्यातील शासकीय वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठा बूस्ट मिळण्याची तयारी आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या काळात राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तब्बल 1100 ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदांची भरती करण्यात येणार आहे.

1100 Medical Posts Cleared!ऑगस्ट 2023 मध्ये आयोगाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर आणि कनिष्ठ निवासी पदांचे सुधारीत मानांकन जाहीर केले होते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नवे पदनिर्मिती प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.

दरम्यान, जुलै 2025 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या उपसमितीने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानंतर उच्चस्तरीय सचिव समितीकडूनही मंजुरी मिळाली आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकवर्ग नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यास याचा फायदा होणार आहे.

Comments are closed.