दहावी निकाल लवकर, प्रवेश सुरू-10th Result Soon, Admissions Open!

10th Result Soon, Admissions Open!

0

बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलेलं आहे. १५ मेपर्यंत दहावीचा निकाल लागू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांत दहावीचा निकाल लावणार असं सांगण्यात आलंय, त्यामुळे लवकरच दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

10th Result Soon, Admissions Open!

पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल (SSC Result Date)

पुढच्या आठवड्यात १५ तारखेपर्यंत दहावीचा निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जरी अधिकृत माहिती अजून आलेली नाही, तरी बारावीच्या निकालानंतर १० दिवसांत निकाल लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दहावीचा निकाल कसा तपासाल? (How To Check 10th SSC Result)

दहावीचा निकाल ऑनलाईन वेबसाइटवर पाहता येणार आहे:

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in

अकरावी प्रवेश प्रक्रिया (11th Admission Process)

अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १९ मेपासून सुरू होत आहे. शालेय शिक्षण विभागानं २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचं वेळापत्रक जाहीर केलंय. राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. शाळांना आवश्यक माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया ८ मेपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा १९ मेपासून सुरू होईल.

बारावी पूरवणी परीक्षा (HSC Supplementary Exam)

बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर झालं असून, ७ ते १७ मे या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.