महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत, तर प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाईल.
परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केले जाईल. पुणे, कोकण, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर, अमरावती व नाशिक या नऊ विभागांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासाचे नियोजन योग्य प्रकारे करावे.
मंडळाने वेळापत्रक लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्याची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून विषयानिहाय तयारी सुरु केली, तर परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत होईल. पालक व शिक्षक देखील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतील.
या तारखा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि परीक्षा तयारी व्यवस्थित करता येईल. त्यामुळे लवकरच आपले अभ्यासाचे नियोजन सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.