८१ हजार कोटी करार; ४० हजार रोजगार!-₹81,000 Cr Deals; 40k Jobs!

0

मुंबईतल्या गोरेगाव इथं झालेल्या आयफा स्टील महाकुंभात राज्य सरकारानं तब्बल ८०,९६२ कोटींचे करार ९ कंपन्यांबरोबर केलेत. या करारांमुळं राज्यात ४० हजारांहून जास्त रोजगार उभारले जाणार आहेत.

चंद्रपूर, सातारा, नागपूर, गडचिरोली, वर्धा, रायगड, संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये स्पंज आयर्न, ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभे राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि संबंधित उद्योग कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक करार झाला.

गुंतवणुकीतून विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाच्या औद्योगिक विकासाला नवं बळ मिळणार असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

Leave A Reply