‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास विभागाला ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना डिसेंबर २०२५ महिन्याचा रखडलेला हप्ता अदा केला जाणार आहे.
२०२५–२६ या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय विभागाने योजनेसाठी एकूण ३,९६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे जानेवारी २०२६ चा हप्ता देण्यास मर्यादा आल्याने, राज्य सरकारने डिसेंबर २०२५ चा लाभ जानेवारीत देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेमुळे काही महिलांना लाभ मिळण्यात अडथळे आले होते. मात्र पात्र लाभार्थ्यांना जानेवारी २०२६ मध्ये हप्ता मिळेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निधीअभावी हप्ते थांबले असल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही या निर्णयामुळे उत्तर मिळाले आहे.

Comments are closed.