विद्यार्थ्यांना दरमहा ₹2500 मदत!-₹2500 Monthly Aid for Students!

₹2500 Monthly Aid for Students!

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने काही निवडक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ₹2500 आर्थिक मदत देण्याची योजना सुरू ठेवली आहे.

 ₹2500 Monthly Aid for Students! ही मदत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतर्गत दिली जाते. या योजनेचा उद्देश एकल महिलांची मुलं, पालक गमावलेली मुलं, अनाथ, निराश्रित, बेघर तसेच आपत्तीग्रस्त मुलांना सक्षम आधार देणे हा आहे.

या योजनेत ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुलांना ही मासिक रक्कम मिळते. शिक्षण, पोषण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ही रक्कम थेट मुलांच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त बालकांनाही या मदतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक कुटुंबांना मोठा हातभार लागतो.

Comments are closed.