राज्यातील शालेय मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोलाची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र सरकारने काही विशिष्ट विद्यार्थ्यांना दरमहा ₹2250 आर्थिक मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून यात एकल महिलांची मुलं, पालक गमावलेली मुलं, अनाथ, बेघर, निराश्रित तसेच आपत्तीग्रस्त मुलांना मासिक सहाय्य मिळतं. या रकमेचा उद्देश मुलांची शिक्षण, पोषण, दैनंदिन खर्च आणि आरोग्याची गरज पूर्ण करण्याकडे आहे.
या योजनेंतर्गत २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना सरळ त्यांच्या खात्यात ₹2250 शिष्यवृत्ती जमा केली जाते. विशेष म्हणजे, एका घरातील एकापेक्षा जास्त मुलांनाही याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे अनेक कुटुंबांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळत आहे.
कोरोनाच्या काळात अनेक मुलांनी आपले पालक गमावले. त्यांचं आयुष्य अंधारात जाऊ नये म्हणून सरकारने या योजनेंतील उत्पन्न निकष पूर्णपणे रद्द करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पात्रतेतील मुलांना कोणत्याही उत्पन्न मर्यादेशिवाय ही मदत मिळणार आहे.
ही मदत शिक्षण थांबू न देता मुलांच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शाळेचे बोनाफाइड, उत्पन्न दाखला, मृत्यू प्रमाणपत्र (लागल्यास), राहिवासी दाखला, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि अंगणवाडी सेविकेसोबतचे छायाचित्र ही कागदपत्रं आवश्यक आहेत.
शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापक पात्र मुलांची माहिती वेळेवर जमा करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तपासणी पूर्ण झाल्यावर महिला व बालविकास विभागाकडून रक्कम थेट मुलांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पंचायत समितीतील बालसंरक्षण अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्थांकडूनही पालकांना सतत मदत आणि मार्गदर्शन दिलं जातं.

Comments are closed.