₹1500 हप्ता आजपासून जमा!-₹1500 Installment Crediting Today!

₹1500 Installment Crediting Today!

लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्याचा ₹1500 चा हप्ता आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

₹1500 Installment Crediting Today!महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

या हप्त्यासाठी सरकारने सुमारे ₹227 कोटी निधी मंजूर केला असून तो महिला व बालविकास विभागामार्फत वितरित केला जात आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होणार आहेत.

ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. जानेवारीपर्यंतचे पैसे आधीच वितरित झाले असून, आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे.

Comments are closed.