महाराष्ट्र राज्याच्या १८व्या आंतर विद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने ८३ गुणांसह विजेतेपद पटकावले आहे. विद्यार्थ्यांनी आपली नेत्रदीपक कामगिरी सादर करत १४ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदके मिळवून एकूण २० पदकांसह सलग सातव्या वर्षी विजयाची मोहोर उमटवली आहे. ही स्पर्धा २८ ते ३१ जानेवारी दरम्यान परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झाली, जिथे २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी मानव्यविद्या, भाषा व ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन व विधी, मूलभूत शास्त्र, शेती व पशु संवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या सहा प्रवर्गात विविध सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळवली.
सहा प्रवर्गातही गटनिहाय विजेतेपद मिळाले असून, मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेत संशोधन क्षेत्रातील ही उज्वल कामगिरी एक सशक्त उदाहरण आहे, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Comments are closed.