८१ हजार कोटी; ४०,३०० नोकऱ्या! – ₹81,000 Cr; 40,300 Jobs!

₹81,000 Cr; 40,300 Jobs!

महाराष्ट्र पोलाद उत्पादनात देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी झपाट्याने वाटचाल करत आहे. राज्यात तब्बल ८१ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यामुळे ४० हजार ३०० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

₹81,000 Cr; 40,300 Jobs!‘आयफा स्टीलेक्स २०२५’ या स्टील महाकुंभाचे उद्घाटन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

सरकारने नऊ कंपन्यांशी सामंजस्य करार केले असून, या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात औद्योगिक गती येणार आहे. हरित पोलादनिर्मितीच्या दिशेने महाराष्ट्र देशात अग्रणी होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

तसेच, २०३० पर्यंत महाराष्ट्राच्या ऊर्जेमध्ये ५८ टक्के वीज अक्षय ऊर्जेतून मिळणार असून, २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सौरऊर्जा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.