लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची ठरू शकते. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता असून, महिलांच्या खात्यात थेट ₹४५०० जमा होऊ शकतात.
नोव्हेंबर व डिसेंबरचे हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने पैसे कधी येणार, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षातच हा प्रश्न सुटू शकतो.
मकरसंक्रांतीच्या आसपास, म्हणजेच १४ जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अत्यावश्यक आहे. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून, वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे पात्र महिलांनी तात्काळ केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.