कृषी प्रवेश २०२५ ! – Agri Admissions 2025 !

0

महाराष्ट्रातील कृषी प्रवेश २०२५साठी थेट महत्त्वाची माहिती! यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारच उत्साहवर्धक राहिला आहे. १६,८२९ उपलब्ध जागांपैकी १३,८९२ जागा भरल्या गेल्या आहेत. खास म्हणजे, सरकारी महाविद्यालयांतील जवळजवळ ९५% जागा भरल्या गेल्या आहेत.

बीएससी कृषी हा अभ्यासक्रम सर्वाधिक पसंतीस आला, तर मत्स्यशास्त्र शाखेच्या सर्व जागा भरल्या आहेत. काही खासगी महाविद्यालयांमध्ये अजूनही काही जागा रिक्त आहेत.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये नऊ प्रमुख अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी १२,९२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर यंदा हा आकडा १३,८९२ वर पोहचला आहे. बीएससी कृषी, बीएससी उद्यानविद्या, बीएससी वनविद्या, बीएफएससी मत्स्यशास्त्र, बीटेक अन्न तंत्रज्ञान, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीएससी सामुदायिक विज्ञान आणि बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ शाखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातून घेतल्या गेल्या.

राज्यातील १९८ संस्थांमध्ये उपलब्ध १६,८२९ जागांपैकी १३,८९२ जागांवर प्रवेश झाला. यापैकी ४७ सरकारी संस्थांमध्ये ३,४८० पैकी ३,३१७ जागा भरल्या गेल्या. बीएससी अॅग्रिकल्चरसाठी ११,५०० जागा होत्या, त्यात १०,१८८ जागांवर प्रवेश निश्चित झाला.

खासगी संस्थांमध्ये १३,३४९ पैकी १०,५७५ जागा भरल्या गेल्या, म्हणजे सुमारे ७९% टक्के. बीएफएससी मत्स्यशास्त्रच्या सर्व ३८ जागा भरल्या गेल्या, तर बीटेक बायोटेक्नॉलॉजीसाठी ९८७ पैकी ६४६ जागा भरल्या गेल्या. बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमालाही चांगली पसंती मिळाली, ८४३ जागांपैकी फक्त १२१ रिक्त राहिल्या. एकूण रिक्त जागा १७.४५% आहेत, ज्यात बहुतेक बीएससी कृषीच्या शाखेत आहेत, विशेषत: खासगी संस्थांमध्ये.

Leave A Reply