जि. प.च्या शिक्षण विभागाचे नियोजन, शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी 4 मार्च पासून सुरु
Zilla Parishad schools will verify the documents of 579 selected teachers on Monday It will be done from 4 March to 9 March 24. The concerned candidates have also been informed for that. The teacher selection list has already been announced. The selection list of 579 teachers has been released and this includes 6 teachers of Urdu medium. After this, it was planned to verify the documents of all of them. Accordingly, Primary Education Officer Meena Shendkar has planned this and this process will be started from Monday.
जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निवडलेल्या ५७९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी आज सोमवार दि. ४ मार्च ते ९ मार्च २४ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांनाही कळविण्यात आले आहे. यापूर्वीच शिक्षक निवडीची यादी जाहीर करण्यात आली आहे. ५७९ शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये ६ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचाही समावेश आहे.
यानंतर या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याचे नियोजन केले असून सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीतील पहिल्या १०० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारी होणार असून मंगळवार ५ मार्च रोजी पुढील १०० म्हणजे २०० पर्यंतच्या उमेदवारांची, ६ मार्च रोजी ३०० पर्यंत, ७ मार्च रोजी ४०० पर्यंत आणि ८ मार्च रोजी ५०० पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. पडताळणीच्या शेवटच्या दिवशी ९ मार्च रोजी ५०० हून अधिक उर्वरित सर्व आणि उर्दू माध्यमातील सहा शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.