जिल्हाधिकारी कार्यालयवर तरुणांचा ठिय्या ; तलाठी भरती रद्दची मागणी – Talathi Bharti Exam Details

0

Talathi Bharti Exam Details –  तलाठी भरती परीक्षेत घोळ झाला असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तलाठी भरतीची परीक्षा रद्द झालीच पाहिजे, दरवर्षी पोलिस भरती झालीच पाहिजे, टीसीएस, आयबीपीएसकडून परीक्षा घेणे बंद झालेच पाहिजे अशा घोषणांनी मंगळवारी (दि.१६ जानेवारी रोजी) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. तलाठी भरती परीक्षेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी नोकर भरतीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

परीक्षा भरतीसह विद्यार्थी प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो बेरोजगार तरुण सहभागी झाले. युवतींची संख्याही लक्षणीय होती. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.

परीक्षांचे शुल्क माघारी मिळालेच पाहिजे, तलाठी भरती परीक्षा रद्द करावी, आयबीपीएस, टीसीएसकडून परीक्षा घेणे बंद करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घ्याव्यात, पोलिस भरती दरवर्षी झालीच पाहिजे अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. उशिरापर्यंत हे तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून होते. कुठल्याही परीक्षांमध्ये कॉपी व अनियमितेचा प्रकार समोर येत असल्याने सामान्य उमेदवारांवर अन्याय होत आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.