SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शनतर्फे कनिष्ठ अभियंता भरती

0

SSC Recruitment – स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना १८ एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच नोंदणीकृत उमेदवार येत्या २२ ते २३ एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ९६८ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेससह अनेक केंद्रीय विभागांमध्ये कनिष्ठ अभियंताच्या रिक्त पदांवर भरती केली जाईल.

 

उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार विहित अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर एससी, एसटीआणि अपंग प्रवर्गातील अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

कनिष्ठ अभियंत्याच्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील अर्जदारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.