शक्तिपीठ महामार्ग १२ जुलैपर्यंत रद्द करा ??? Shaktipeeth Expressway News

Shaktipeeth Expressway News

0

Shaktipeeth Expressway News: मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानंतर आता नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग सुरु होणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग हा जवळपास 800 किलोमीटरचा असणार आहे. या सुफरफास्ट हायवेमुळे नागपूर ते गोवा 11 तासांत गाठता येणार आहे. मात्र आता, हा महामार्ग प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या 800 किलोमीटरच्या शक्तीपीठ सुपरफास्ट हायवेसाठी सध्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोल्हापूरमधून या प्रोजेक्टला कडाडून विरोध होऊ लागला आहे. लोक रस्त्यावर उतरुन या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करु लागले आहेत. प्रस्तावित प्रोजेक्टमध्ये जमिनी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेतकरी याविरोधात रस्त्यावर आले आहेत. त्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपले आंदोलन सुरु केले आहे. सध्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यायलावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकवटले आहेत.

नागपूर-गोवा अंतर फक्त 11 तासांत पार होणार दुसरीकडे, हा महामार्ग पूर्ण झाल्यास नागपूर ते गोवा अंतर फक्त 11 तासांत पार करता येणार आहे. राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा 760 किलोमीटरचा सुपरफास्ट हायवे बांधण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यातून जातो. राज्य रस्ते विकाम महामंडळाने हा महामार्ग प्रस्तावित केला आहे. नागपूर ते गोवा अंतर जवळपास एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. नागपूरहून निघाल्यास गोव्याला पोहोचण्यासाठी तब्बल 22 तास लागतात. मात्र आता हा महामार्ग पूर्ण झाल्यास हे अंतर 11 तासांत पार करता येणार आहे. एवढेच नाहीतर या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या मालाला थेट पश्मि महाराष्ट्रासह कोकणातली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.