पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु, जाणून घ्या कोणती कागदपत्रे आवश्यक? @ policerecruitent2024.mahait.org

0

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30/03/2024 पर्यंत www.policerecruitent2024.mahait.org या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता. 

परीक्षा शुल्क : सर्व पदासाठी खुलावर्ग – 450 मागासवर्ग – 350 रुपये कोणताही उमेदवार एका घटकातील पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करू शकतो. उमेदवार पाच पदांसाठी पात्र असेल तर 5 स्वतंत्र अर्ज करू शकतो.

आवश्यक कागदपत्रे – एस.एस.सी./एच.एस.सी. उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवाशी प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र अथवा पडताळणी पोहोचपावती, नॉन – क्रिमिलेयर प्रमाणपत्र माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, पोलिस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र, एन.सी.सी. प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक.

1) पोलिस शिपाई गट – क : वयोमर्यादा 31.3.2014 पर्यंत खुला 18 कमाल 28 वर्षे, मागासप्रवर्ग 18 ते 33 वर्षे, प्रकल्पग्रस्त 18 ते 45 वर्षे, भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्षे, माजी सैनिक 18 ते सर्व्हिस + 3 वर्षे, पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 ते 55 वर्षे अनाथ 18 ते 33 वर्षे.

शैक्षणिक अर्हता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण, स्टेट बोर्ड CBSC बोर्ड चालते) वर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ-प्रथमवर्षे उत्तीर्ण झालेला उमेदवार विद्यापीठे, मानवी विद्यापीठे, ऐच्छिक भाग शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षता किंवा व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने 2 वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची संभवता निश्चित केलेले डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग, शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण यांचेकडील पत्र, माजी सैनिक 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्व असणार्‍या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा IASC प्रमाणपत्र व 15 वर्षे सैनिक सेवा पूर्व नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद 7 वी परीक्षा उत्तीर्ण शारीरिक पात्रता- महिला उंची 155 सें.मी.पेक्षा कमी नसावी. पुरुष 165 सें.मी.पेक्षा कमी नसावी, तृतीयपंथी – 155 सें.मी.पेक्षा कमी नसावी (महिला), तृतीयपंथी – 165 सें.मी.पेक्षा कमी नसावी (पुरुष), खेळाडे उमेदवारांसाठी किमान उंचीमध्ये 2.5 से.मी. इतकी सूट असेल पोलिस दलातील कर्मचारीच्या कुटुंबीयाबाबत उंची 2.5 से.मी.शिथिल, हलकी वाहने चालविण्याचा (LMV) परवाना धारण करणे आवश्यक आहे. नसेल तर दोन वर्षांत धारण करावा. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक महाराष्ट्र शासन 20-10-2022 च्या अन्वये NCC ‘C’ प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार यांना अधिक 5 गुण देण्यात येतील.

शारीरिक चाचणी – 50 गुण
पुरुष
1) 1600 मीटर धावणे – 20 गुण
2) 100 मीटर धावणे – 15 गुण
3) गोळाफेक – 15 गुण
महिला
1) 800मीटर धावणे – 20 गुण
2) 100 मीटर धावणे – 15 गुण
3) गोळाफेक – 15 गुण

लेखी चाचणी :- शारीरिक मध्ये किमान 50% गुण म्हणजे 25 गुण असणारे उमेदवार लेखीसाठी पात्र 1:10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी चाचणी उमेदवारांना लेखी चाचणी उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य, लेखी परीक्षा 90 मिनिटे. एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेतील विषय – अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घाडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण प्रश्न 100 गुण 100.
पोलिस शिपाई चालक :- वयोमर्यादा पोलिस शिपाई प्रमाणेच,

शैक्षणिक अर्हता :- पोलिस शिपाई प्रमाणे.,

शारीरिक पात्रता – उंची महिला – 158 सें.मी. पुरुष – 165 सें.मी., तृतीयपंथी महिला – 158 सें.मी. पुरुष – 165 सें.मी. (LMV- TR) यासाठी चालविण्याचा वैध परवाना धारक करणे आवश्यक राहील तसेच सर्वोच्य न्यायालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार हलके वाहन चालविण्याचा (LMV) किंवा हलके वाहन चालविण्याचा (LMV- TR) यापैकी कोणत्याही एक वैध परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलिस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करता येईल.

शारीरिक चाचणी – 50 गुणांची
पुरुष
1600 मीटर धावणे 30 गुण
गोळाफेक 20गुण
महिला
800 मीटर धावणे 30 गुण
गोळाफेक 20 गुण
तृतीयपंथी
पु. 1600 मीटर 30 गुण.
म. 800 मीटर – 30 गुण.

3) पोलिस शिपाई बॅण्डस्मन :- वयोमर्यादा पोलिस शिपाई प्रमाणे उंची महिला 155 सेमी, पुरुष – 165 सें.मी. बॅड पथकातील पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे आवश्यक. वाद्या वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील. शारीरिक चाचणी पोलिस शिपाई भरती प्रमाणे. लेखी चाचणी – 100 प्रश्न, 100 गुण, परीक्षा शिपाई प्रमाणे या घटकांची परिक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल.

4) सशस्त्र पोलिस शिपाई : वयोमर्यादा 31/03/2024 किमान व कमाल वयोमर्यादा खुला किमान 18 वर्षे, कमाल 25 वर्षे, मागासवर्ग – 18 ते 30 वर्षे, प्रकल्पग्रस्त – 18 वर्षे ते 45 वर्षे, भूकंपग्रस्त, – 18 वर्षे – 45 वर्षे, माजी सैनिक – 18 वर्षे – 55 वर्षे, अनाथ 18 वर्षे ते 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता :- पोलिस शिपाई प्रमाणे
शारीरिक पात्रता – पुरुष 168 सें.मी.पेक्षा कमी नसावी. छाती न फुगवता 79 सें.मी., फुगवून 5 सें.मी. अधिक
शारीरीक चाचणी :-

1) 5 कि.मी. धावणे – 50 गुण. 2) 100 मीटर धावणे – 25 गुण. 3) गोळा फेक – 25 गुण.
एकूण 100 गुण.
लेखी चाचणी – पोलिस शिापाई प्रमाणे – 100 प्रश्न, 100 गुण वेळ – 90 मिनिटे.

5) कारागृह शिपाई – वयोमर्यादा 31-03-2024 रोजी पोलिस शिपाई प्रमाणे शैक्षणिक व शारीरिक पात्रता पोलिस शिपाई प्रमाणे, शारीरिक चाचणी लेखी परीक्षा पोलिस शिपाई प्रमाणे.
लेखी परीक्षा तयारी :- शारीरिक पात्रता परीक्षा झाल्यावर लेखी परीक्षा घेण्यात येईल. मराठी -बाळासाहेब शिंदे- गणित – नितीन महाले,
बुध्दीमापन – अंकलगी /स्मार्ट स्टडी, सामान्य ज्ञान- स्टेट बोर्ड टोकळा किंवा कुनकेट. झालेले आतापर्यंचे पेपर यांचा सराव करा. चालू घाडामोडीसाठी वर्तमानपत्र वाचन करा.

Leave A Reply

Your email address will not be published.