मराठा तरुणांना १० टक्के आरक्षण कधी? पोलीस भरती अर्जाची मुदत २५ दिवस अन्‌ जात प्रमाणपत्र मिळते ४५ दिवसांत! – Police Bharti Maratha Aarakshan 2024

0

Police Bharti Maratha Aarakshan 2024 Update – मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा शासन निर्णय झाला. पण, अजूनपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाप्रमाणे जातीचा दाखला मिळणे सुरू झालेले नाही. गृह विभागातर्फे १७ हजार पोलिसांची भरती सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. दुसरीकडे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यापासून ४५ दिवसांची तर नॉन क्रिमिलेयरसाठी १५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे आरक्षण मिळूनही मराठा समाजातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनच अर्ज करावा लागतोय, अशी वस्तुस्थिती आहे.

 

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण, महसूल विभागाच्या जात प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत ‘एसईबीसी’चा पर्याय दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजातील आरक्षणास पात्र विद्यार्थ्यांना, तरुणांना नॉन क्रिमिलेयर किंवा जातीचा दाखला मिळण्यास अडचणी येत असल्याचे काही आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सांगितले.

नॉन क्रिमिलेयर मिळण्याची मुदत साधारणत: १५ दिवस तर जातीच्या प्रमाणपत्राची मुदत ४५ दिवसांची आहे. मात्र, पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता केवळ २५ दिवसच आहे. त्यामुळे आरक्षण देऊनही त्याचा फायदा या भरतीत मराठा समाजातील तरुणांना होणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांना अद्याप टाळेच असून आपले सरकार सेवा केंद्रे देखील बहुतांश बंदच आहेत. त्यामुळे यासंदर्भात आता सरकार पातळीवरून किंवा जिल्हा प्रशासनाकडून काय उपाय काढला जातोय, याकडे मराठा समाजातील तरुणांचे लक्ष लागले आहे. ऑनलाइन पोर्टलला नवीन प्रवर्ग समाविष्ट झाल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज स्वीकारलाच जात नाही. त्यामुळे ज्यावेळी महसूलच्या ऑनलाइन पोर्टलला एसईबीसीचा पर्याय येईल, त्यावेळी संबंधितांना काही दिवसांत दाखले देण्याचे नियोजन आम्ही निश्चितपणे करू.

Leave A Reply

Your email address will not be published.