नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली | PM Modi oath-taking ceremony
PM Modi oath-taking ceremony
PM Modi oath-taking ceremony: रविवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यात राजकीय नेते, मान्यवर, देशातील प्रमुख व्यापारी आणि कलाकार उपस्थित होते. शपथविधीसोबतच, पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे मोदी हे एकमेव भारताचे पंतप्रधान आहेत. मोदींसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मोदींच्या शेवटच्या कार्यकाळातही गृह, संरक्षण, वित्त, परराष्ट्र व्यवहार आणि महामार्ग आणि वाहतूक या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती होती.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर आज (९ जून) नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यासंबंधीचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही खासदारांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र भाजपातील चार, शिंदे गटाचा एक आणि आरपीआय आठवले गटातील एका नेत्याला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच अजित पवार गटही एक मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. यासह रालोआचं तिसरं सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेलुगू देशम पार्टीला आणि संयुक्त जनता दलाला मोठी खाती दिली जाण्याची शक्यता आहे. जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांच्या पक्षाने थेट नितीन गडकरींकडे असलेलं रस्ते विकास खातं आणि अश्विनी वैश्णव यांच्याकडील रेल्वे खातं मागितल्याची चर्चा आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांना मंत्रिपद मिळू शकतं. तर भाजपामधून नारायण राणे, रक्षा खडसे आणि उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासह आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद कायम राहणार आहे. मंत्रिपदासाठी आतापर्यंत नितीन गडकरी, रक्षा खडसे, पीयुष गोयल यांना पक्षनेतृत्वाने फोन केला आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुलरीधर मोहोळ यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या काही वृत्तविन्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच प्रतापराव जाधव यांनादेखील मंत्रिपदासाठी फोन आला आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसेंना राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं.
आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह ६९ खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राजनाथ सिंह यांनी याआधी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये गृहमंत्री आणि दुसऱ्या टर्ममध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते. राजनाथ सिंह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत आणि त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.
राजनाथ सिंह यांनी १९७४ मध्ये राजकीय इनिंगला सुरुवात केली आणि १९७७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९८८ मध्ये एमएलसी झाल्यानंतर ते १९९१ मध्ये यूपीचे शिक्षणमंत्री झाले. या काळात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. यानंतर ते १९९४ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. यानंतर १९९९ मध्ये त्यांना पहिल्यांदा केंद्रीय परिवहन मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा ड्रीम प्रोजेक्ट राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम सुरू केला. ऑक्टोबर २००० मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. यावेळी ते बाराबंकीच्या हैदरगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मे २००३ मध्ये त्यांना केंद्रीय कृषी मंत्री आणि अन्न प्रक्रिया मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी कॉल सेंटर आणि शेतकरी उत्पन्न विमा योजना सुरू केली. राजनाथ सिंह डिसेंबर २००५ ते २००९ या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. यादरम्यान, २००९ मध्ये ते गाझियाबादमधून खासदार म्हणून निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यानंतर या खासदारांनी घेतली शपथ राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या नंबरला नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. गडकरी यांच्यानंतर जे.पी.नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डा यांच्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली. चौहान यांच्यानंतर निर्मला सीतारमन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.