नवोदय विद्यालयात १३७७ पदांची मोठी भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – NVS non teaching staff recruitment 2024

NVS non teaching staff recruitment 2024

0

NVS Bharti 2024

मित्रांनो, आपण नोकरीच्या शोधात आहात का? तर मग आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. नवोदय विद्यालय समिती भरती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही अखेरची संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरु झालेली आहे. तर लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. नवोदय विद्यालय समितीने ही भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 30 एप्रिल 2024 होती. पण आता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ झालेली आहे. तर जाणून घ्या, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती.

नवोदय विद्यालय समितीने विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. नॉन-टीचिंग पदांसाठी ही भरती सुरु झालेली आहे. आता तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी 7 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. ही खरोखरच एक मोठी संधी आहे. ही मेगा भरती असून, त्यासाठी 1377 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तेथे तुम्हाला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. काही तांत्रिक समस्या असल्याने अनेक इच्छुक उमेदवार हे अर्ज करू शकले नव्हते. म्हणूनच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ झालेली आहे.

  • पदसंख्या – 1377 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 -35 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • GEN/OBC – 1000/-
    • SC/ST – 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://navodaya.gov.in/

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावे लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असल्याने, वयाची आणि शिक्षणाची अट पदानुसार लागू करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

 

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इलेक्ट्रीशियन, ऑडिट असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मग अर्ज करावीत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला परीक्षा ही द्यावी लागणार आहे, ही मोठी संधी नक्कीच आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.