महावितरणमध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी!

3

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. महत्वाचे म्हणजे महावितरण मध्ये मेगा भरतीला सुरूवात झालीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये.

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया अमरावती युनिटसाठी सुरू आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब ही आहे की, या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज ही करू सकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. यापूर्वीच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 18 ते 30 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला आणि दहावी पास असावी.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, अमरावती येथे पाठवावा. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून करू शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल.

अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, तिथे तुम्हाला सर्व माहिती ही भरावी लागणार आहे. माहिती जर अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही. ही भरती प्रक्रिया 56 पदांसाठी होत आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

3 Comments
  1. Bhushan Ughade says

    Yes

  2. Sunita Nitin Kale says

    Mahavitran recrvitment

  3. Dhondba laxman metewad says

    Mahavitrn requcriment

Leave A Reply

Your email address will not be published.